Advertisement

मुख्यमंत्र्यांचे संकेत खरे ठरतात - राणे


मुख्यमंत्र्यांचे संकेत खरे ठरतात - राणे
SHARES

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना स्थान देण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. त्यावर बुधवारी नारायण राणे यांना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेले संकेत खरेच ठरतात असं सांगत मुख्यमंत्री नेमके काय बोलले ते पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली.


कुठल्याही अपेक्षा नाहीत

माझ्या कुठल्याही अपेक्षा नाहीत. मी महाराष्ट्रात सर्व पदे भूषविली आहेत. महत्वाकांक्षा बऱ्याच असल्या तरी मी संतुष्ट आणि समाधानी आहे, असंही राणे यांनी यावेळी सांगितलं.

मुंबईतील मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेत गेले आहेत. या फोडाफोडीवरून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात शब्दयुद्ध पेटलं आहे. याबाबत विचारले असता या दोघांमधील वाद हा घरगुती मामला आहे. मी त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही, असं राणे म्हणाले. राजकारणात नाते आणि नैतिकता आता शिल्लक राहिलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

दिवाळीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा