Advertisement

दिवाळीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत


दिवाळीनंतर मंत्रिमंडळात फेरबदल, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
SHARES

दिवाळीच्यानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळात फेरबदल होणाची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे संकेत दिले आहे. असे सांगितले जात आहे, की काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये भाजपाचे अध्यक्ष अमित शाह, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली झाली होती. या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

फ्रि प्रेस जनरल या वृत्तापत्राने दिलेल्या वृत्तानुसार दिवाळीच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्र्यांनी आपल्या वर्षा या बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना सांगितले, दिवाळीच्यानंतर लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होतील. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, नारायण राणे यांना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) हे खाते दिले जाऊ शकते.



हेही वाचा - 

मी अहमदाबादमध्ये अमित शाह अथवा देवेंद्र फडणवीस यांना भेटलो नाही- राणे


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा