Advertisement

विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी सरासरी ६९.०८ टक्के मतदान

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मतदानात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी अंदाजे ६९.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी सरासरी ६९.०८ टक्के मतदान
SHARES

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या (maharashtra legislative assembly) ३ पदवीधर, २ शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं. या मतदानात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी अंदाजे ६९.०८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर ६१.०८ टक्के, पुणे पदवीधर ५०.३० टक्के, नागपूर पदवीधर ५४.७६ टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ ८२.९१ टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ ७०.४४ टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे ९९.३१ टक्के मतदान झालं.

विधान परिषदेच्या निमित्ताने वर्षभरापूर्वी सत्तेत आलेली महाविकास आघाडी आणि विरोधी बाकांवर बसलेला भाजप (bjp) पहिल्यांदाच राज्यातील निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील पक्षांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली आहे.

अमरावती शिक्षक निवडणुकीत शिवसेना (shiv sena) आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणूक सहजरित्या जिंकण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आसुसले आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा (ncp) बालेकिल्ला असल्याचं जयंत पाटील यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे.

या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या वरच्या फळीतील नेत्यांनी जोरदार प्रचार केला आहे. यामुळे या जागा कुणाच्या ताब्यात जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement