महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत यासंदर्भात घोषणा केली. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे.
यावेळी माहिती देताना केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांना भेट दिली होती. आम्ही तेथील सर्व व्यवस्थेचा अभ्यास केला होता. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. यातील 234 जागा या सर्वधाराण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी 25 तर 29 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.
ते पुढे म्हणाले की, जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्व बूथवर सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ज्येष्ठ नागरिकांसाठी, ज्यांचं वय 85 पेक्षा जास्त आहे त्यांना त्यांच्या घरातूनच मतदान करण्याची सुविधा प्राप्त करून देण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना निवडणूक आयोगाचा एक फॉर्म भरावा लागणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेचा काळ 26 नोव्हेंबर रोजी संपत आहेत. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी उमेदवार आहेत.
महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हे एका बाजूला असतील. दुसरीकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे शरद पवार हे असतील.