Advertisement

“दोन दिवसाचं अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही”

हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीवरून विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका केली जात असतानाच अवघ्या दोन दिवसांचं विधीमंडळ अधिवेशन लोकशाहीला पोषक नसल्याचं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.

“दोन दिवसाचं अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही”
SHARES

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन  (maharashtra legislative assembly) नागपूर ऐवजी मुंबईतच होणार आहे. १४ आणि १५ डिसेंबर असं दोन दिवसीय अधिवेशनाचं स्वरूप असणार आहे. अधिवेशनाच्या कालावधीवरून विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका केली जात असतानाच अवघ्या दोन दिवसांचं विधीमंडळ अधिवेशन लोकशाहीला पोषक नसल्याचं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं आहे.

राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईतच घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कोरोनामुळे विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन देखील पुढं ढकलण्यात येऊन थोडक्यात आटोपण्यात आलं होतं. त्यात पुन्हा हिवाळी अधिवेशन देखील २ दिवासांत आटोपण्यात येणार असल्याने भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. 

कोरानाचं संकट अजूनही संपलेलं नाही. विधीमंडळ अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या (maharashtra) कानाकोपऱ्यातून लोकप्रतिनिधी येतात. विविध प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी सर्वसामान्य एकवटतात, काही वेळेस आंदोलनं केली जातात. यामुळे कोरानाचा संसर्ग वाढू शकतो, हा अंदाज घेऊन कमी कालावधीचं अधिवेशन ठेवण्यात आलं आहे. परंतु दोन दिवसाचं अधिवेशन लोकशाहीला पोषक नाही. यामुळे अधिवेशन कामकाज जादा कालावधीत कसं चालेल, यासाठी नवीन नियमावली कशी करता येईल यावर चर्चा सुरू असल्याची माहिती नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

हेही वाचा- विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपला दणका

हिवाळी अधिवेशनापूर्वी खबरदारी म्हणून सर्वांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय देखील विधीमंडळाने घेतला आहे. यासाठी १२ आणि १३ डिसेंबर रोजी विधानभवन परिसरात तपासणी शिबीर घेतलं जाणार आहे.

या अधिवेशनासाठी येणाऱ्या राज्यातील दोन्ही सभागृहातील आमदारांसह विधानभवन आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. ज्यांची कोरोना (coronavirus) चाचणी पॉझिटिव्ह येईल त्यांना विधानभवनात प्रवेश दिला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकांची वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार तपासणी शिबिरात एकूण सात बुथ उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर तपासणी झालेल्यांना अहवाल प्राप्त करुन घेण्यासाठी टोकन देण्यात येणार आहेत. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल अशा रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. रुग्णांनी घाबरुन न जाता तपासणी शिबिरातील आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

ज्यांना शासनमान्य खासगी प्रयोगशाळेत तपासणी करावयाची आहे, त्यांनी अधिवेशनाला येताना आपला अहवाल १२ आणि १३ तारखेचाच असला पाहिजे याची नोंद घ्यावी.

(maharashtra vidhan sabha president nana patole unhappy on 2 day winter session)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा