Advertisement

महाविकास आघाडीची पाॅवर जोखण्यात कमी पडलो- देवेंद्र फडणवीस

विधान परिषदेतील पराभवाची मिमांसा करताना महाविकास आघाडीची एकत्रित पाॅवर जोखण्यात कमी पडल्याची कबुली विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महाविकास आघाडीची पाॅवर जोखण्यात कमी पडलो- देवेंद्र फडणवीस
SHARES

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बहुतांश जागा जिंकत भाजपचा (bjp) सपशेल पराभव केला. या पराभवाची मिमांसा करताना महाविकास आघाडीची एकत्रित पाॅवर जोखण्यात कमी पडल्याची कबुली विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

विधान परिषद निवडणूक निकालानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. आम्ही अधिक जागांची अपेक्षा केली होती. परंतु केवळ एकच जागा आम्हाला जिंकता आली. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं एकत्रित बळ ओळखण्यात, मतांची आकडेमोड करण्याचा आमचा अंदाज चुकला. 

१ डिसेंबरला झालेल्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला हाती घेण्यात आली. शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे रिंगणात उतरण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार सहापैकी ४ पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचे निकाल लागले असून काँग्रेस, राष्ट्रवादीला ३ जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर निकालाची प्रतिक्षा आहे. 

हेही वाचा - विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपला दणका

विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागले आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल जिंकले आहेत. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे (ncp) सतीश चव्हाण आणि पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड विजयी झाले आहेत. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. 

अमरावती मतदारसंघात शिवसेना (shiv sena) आणि भाजपवर नामुष्कीची वेळ आली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना लढवत असलेली एकमेव जागा देखील पक्षाला जिंकता आलेली नाही. तर दुसरीकडे याच मतदारसंघात भाजपच्या उमेदवारावर फेरीतून बाद होण्याची वेळ आली आहे. 

महाविकास आघाडीच्या दृष्टीने हा मोठा विजय आहे. एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय या निकालांवरून सध्या तरी यशस्वीच ठरल्याचं म्हटलं जात आहे.

(opposition leader devendra fadnavis reaction on maha vikas aghadi victory in maharashtra vidhan parishad election)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा