Advertisement

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपला दणका

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे जवळपास सर्व निकाल हाती आले असून त्यात महाविकास आघाडीने भाजपला मोठा दणका दिला आहे.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपला दणका
SHARES

महाराष्ट्र विधान परिषदेच्या (maharashtra legislative assembly) पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे जवळपास सर्व निकाल हाती आले असून त्यात महाविकास आघाडीने भाजपला मोठा दणका दिला आहे. १ डिसेंबरला झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला हाती घेण्यात आली.

शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (congress) या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे रिंगणात उतरण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार सहापैकी ४ पदवीधर-शिक्षक मतदारसंघांचे निकाल लागले असून काँग्रेस, राष्ट्रवादीला ३ जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर निकालाची प्रतिक्षा आहे. विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागले आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल जिंकले आहेत. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि पुणे पदवीधरमध्ये अरुण लाड विजयी झाले आहेत. 

नागपूर आणि पुणे या भाजपने (bjp) प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. 

हेही वाचा- मुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुणे पदवीधर मतदार संघात विजयासाठी १ लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी १ लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत विजय मिळवला. तर भाजपच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली. विधानभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपला धक्का बसला आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला. तर भाजपचे संदीप जोशी दुसऱ्या क्रमांकावर राहिले.  

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. सतीश चव्हाण यांना १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतांवर समाधान मानावं लागलं आहे.

अमरावती मतदारसंघात शिवसेना (shiv sena) आणि भाजपवर नामुष्कीची वेळ आली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना लढवत असलेली एकमेव जागा देखील पक्षाला जिंकता आलेली नाही. तर दुसरीकडे याच मतदारसंघात भाजपच्या उमेदवारावर फेरीतून बाद होण्याची वेळ आली आहे. 

(maharashtra vidhan parishad teachers and graduates constituency election results)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा