Advertisement

लोकलमध्ये आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी

दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीसाठी शाळा उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकलमध्ये आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी
SHARES

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये आता शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीसाठी शाळा उघडण्यात येणार आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने मध्य आणि पश्चिम रेल्वेला यासंदर्भात एक पत्र लिहून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी विनंती केली होती. ही विनंती रेल्वेने मान्य केली आहे.

मुंबई लोकलची दारे हळूहळू सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली होत आहेत. टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्गातील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. २३ नोव्हेंबरनंतर ५० टक्के उपस्थितीतचे सूत्र निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारकडून मध्य आणि पश्चिम रेल्वेला पत्र लिहिण्यात आले होते.

याआधी सरकारी कर्मचाऱ्यांना, कोर्टात काम करणाऱ्या वकिलांना आणि कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिली होती.. तसंच नवरात्रात सर्व महिलांसाठीही लोकल प्रवास सुरु करण्यात आला. आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.



हेही वाचा -

राज्यभरात फटाकेबंदीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाकडून अमान्य

कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी लवकरच, सीरमकडून घोषणा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा