Advertisement

महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारलं- शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेतील विजय म्हणजे महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारल्याचंच निदर्शक असल्याचं म्हटलं आहे.

महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारलं- शरद पवार
SHARES

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघतील निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला (bjp) दणका दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून या निवडणुकीवर प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारल्याचंच निदर्शक असल्याचं म्हटलं आहे.

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ६ जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला हाती घेण्यात आली. निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे रिंगणात उतरण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार सहापैकी ४ पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या लागलेल्या निकालांत काँग्रेस (congress), राष्ट्रवादीला ३ जागांवर विजय मिळाला आहे. तर एका जागेवर निकालाची प्रतिक्षा आहे. विरोधी पक्ष ठरलेल्या भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. धुळे-नंदुरबार या एकमेव मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल जिंकले आहेत.

हेही वाचा- विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा भाजपला दणका

त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार (sharad pawar) म्हणाले. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा हा निकाल म्हणजे महाविकासआघाडीचा विजय आहे. महाविकासआघाडी सरकारने एकत्र काम केल्यानेच हे यश मिळालं आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघात मतांची मोठी आघाडी भाजपच्या हाती असल्याने आमच्यासाठी हा निर्णय आश्चर्यकारक नव्हता. परंतु गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी सरकारने जे काम केलं त्या कामाच्या जोरावर पुणे आणि नागपूर मतदाससंघातील कधीही न मिळालेली जागा देखील महाविकास आघाडीच्या वाट्याला आले हाच खरा विजय. या निकालातून सर्वसामान्य लोकांनीही महाविकासआघाडी सरकारला स्वीकारल्याचं दिसलं आहे. महाराष्ट्रतील चित्र बदलल्याचं हे द्योतक आहे, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

या निकालांमुळे महाविकास आघाडीच्या एकत्रित निवडणूक लढण्याच्या निर्णयाचं तिन्ही पक्षांतील पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. यापुढील निवडणुका देखील एकत्रित लढण्याकडे तिन्ही पक्षांचा कल वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

(ncp chief sharad pawar reaction on maha vikas aghadi victory in maharashtra vidhan parishad teachers and graduates constituency election)

हेही वाचा- सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? शरद पवार म्हणाले...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement