Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? शरद पवार म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं विधान केलं आहे.

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? शरद पवार म्हणाले...
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे सुप्रिया सुळे या राज्याच्या राजकारणात सर्वोच्चपदी बसणार की केंद्रातील राजकारणात सक्रीय राहणार यावरील पडदा काही अंशी दूर झाल्याचं म्हणावं लागले.

कशी सुरू झाली चर्चा?

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी संपादित केलेल्या 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी 'एखादी कर्तृत्ववान मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं. शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरीच लोकं बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत,' अशी अपेक्षा शरद पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळं आपसूकच पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या (ncp) नेत्या सुप्रिया सुळे यांचं नाव चर्चेत आलं.

हेही वाचा- बाॅलिवूडमधील वादावर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले…

ही चर्चा सुरू असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'शरद पवार यांना संधी मिळाल्यास ते पुतणे अजित पवार यांच्या ऐवजी सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करतील, असं असं वक्तव्य केल्याने या चर्चेतील रंगत वाढली. त्यावर खुद्द शरद पवार यांनीच एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 

काय म्हणाले पवार?

यासंदभात शरद पवार म्हणाले, प्रत्येकाची आवड असते. सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. म्हणूनच सुप्रिया सुळे यांना उत्तम संसदपटू म्हणून देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तरुण नेत्यांचा मोठा संच आहे. यातून सर्वमान्य होतील अशी अनेक नेत्यांची नावं घेता येतील. त्यात अजित पवार आहेत, जयंत पाटील, धनंजय मुंडे असे नेते नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाची शक्यता फेटाळून लावली.

(ncp chief sharad pawar clarifies on cm post for supriya sule in maharashtra)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा