Advertisement

बाॅलिवूडमधील वादावर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले…

आतापर्यंत मौन बाळगून असलेल्या आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

बाॅलिवूडमधील वादावर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन, म्हणाले…
SHARES

बॉलिवूडमधील घराणेशाही, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण आणि ड्रग्ज कनेक्शन यावरून आरोप प्रत्यारोपाचा खेळ रंगलेला असताना विरोधी पक्ष भाजप, खासकरून राणे पितापुत्राकडून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनाही या प्रकरणात खेचण्याचा प्रयत्न झाला. यावर आतापर्यंत मौन बाळगून असलेल्या आदित्य यांनी पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणाले, फूटबाॅलमध्ये एखादा चांगला खेळाडू असेल, तर त्याला मॅन टू मॅन मार्किंग केलं जातं. मेस्सी किंवा रोनाल्डो यांसारख्या खेळाडूंना घेरण्यात येतं, जेणेकरून त्यांनी गोल करू नये. तशाच पद्धतीने कदाचित त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल म्हणून माझ्यावर वैयक्तिक हल्ले चढवण्यात आले. परंतु या आरोपांकडे दुर्लक्ष करणंच योग्य असल्याचा मी विचार केला. शिवाय कामावर पूर्ण लक्ष केंद्रीत असल्याने या आरोपांकडे लक्ष गेलं नाही.

हेही वाचा- पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान नाही, मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

राहीला प्रश्न महाविकास आघाडी सरकारचा तर हे सरकार अत्यंत उत्तमरित्या काम करत असल्यानेच सरकारच्या कामांवर कुठलेही प्रश्न उपस्थित झाले नाहीत. ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. पुढील ५ वर्षे आम्ही काम करु, राजकारण नाही, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

बाॅलिवूड इंडस्ट्री (bollywood) ही व्यसनांच्या आहारी गेलेली इंडस्ट्री असल्याची प्रतिमा विरोधकांकडून रंगवण्यात आली, यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, आता जे लोक विरोधी पक्षात बसले आहेत, ते जेव्हा सत्तेत होते तेव्हा त्यांना हेच सर्व जण (बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मुंबई पोलिस) चांगले वाटत होते. विमान भरुन कलाकारांना दिल्लीला कार्यक्रमात घेऊन जायचे. त्यांच्याकडून केंद्रातील सत्ताधाऱ्यांसाठी गाणी गाऊन घेतली जायची. त्यांच्याशी चांगले संबंधही होते. 

पण जेव्हापासून सरकार गेलं तेव्हापासून त्यांना  बॉलिवूड, मुंबईचे लोकं, मुंबई पोलीस (mumbai police) वाईट वाटू लागले आहेत. मुंबईला ड्रग्ज सेंटर म्हणण्यात आलं. सरकार बदलल्याने त्यांच्या चश्म्याचा नंबरही बदलला असावा. खरं तर मुंबई, महाराष्ट्रात होणाऱ्या चांगल्या गोष्टींमुळे त्यांच्या पोटात दुखत असल्यानेच ते आरोप करत सुटले आहेत, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.

(maharashtra environment minister aaditya thackeray reacts on bollywood drugs connection and ssr case)

हेही वाचा- उद्धव, आदित्य ठाकरेंवर भाजपचा पुन्हा गंभीर आरोप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा