Advertisement

व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या प्रयत्नांना राज्यपालांचीही साथ


व्हीआयपी संस्कृती संपवण्याच्या प्रयत्नांना राज्यपालांचीही साथ
SHARES

महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या आदेशाने शुक्रवारी त्यांच्या शासकीय वाहनावरील लाल दिवा उतरवण्यात आला. राज्यपालांनी स्वतःच्या शासकीय वाहनावरचा लाल दिवा उतरवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार त्यांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि परिवार प्रबंधक वसंत साळुंके यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या शासकीय वाहनाचे चालक मोहन सिंग बिश्त यांनी शुक्रवारी राज्यपालांच्या गाडीवरचा दिवा उतरवला.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि सरन्यायाधीश वगळता कोणत्याही मंत्री, अधिकाऱ्यांना आपल्या वाहनावर लाल दिवा लावता येणार नाही. येत्या 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. पण त्याआधीच मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांनी स्वतःच्या शासकीय गाडीवरचा लाल दिवा उतरवला. महाराष्ट्राव्यतिरिक्त तामिळनाडूच्या राज्यपालपदाचा कार्यभार असलेल्या चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी देशातील व्हीआयपी संस्कृती संपविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्यपालांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा हटविण्याचे सूचित केले, अशी माहिती राजभवनातून देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा