'मराठा समाजातल्या महिलांनी स्वावलंबी व्हावं'

 Fort
'मराठा समाजातल्या महिलांनी स्वावलंबी व्हावं'

सीएसटी - मराठी पत्रकार संघात जिजाऊ ब्रिगेडनं पत्रकार परिषद घेतली. या वेळी विदर्भात मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणात आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे या समाजाला आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी मराठा कुणबी समाजाच्या महिलांना स्वावलंबी करण्याची गरज आहे, असं मत जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. छायाताई महाले यांनी व्यक्त केलं. त्यासाठी सरकारनं या समाजाच्या महिलांना उदयोग व्यवसायाचं प्रशिक्षण द्यावं. तसंच शून्य व्याज दरानं कर्ज उपलब्ध करून देऊन बाजारपेठा उपलब्ध करून द्यावात, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडनं सरकारकडे केली.

Loading Comments