Advertisement

महाराष्ट्र सरकारची हटके योजना,'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेत ५० लाख जिंकण्याची संधी

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळाव यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

महाराष्ट्र सरकारची हटके योजना,'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेत ५० लाख जिंकण्याची संधी
SHARES

शहरांसोबतच आता ग्रामीण भागात कोरोनाचा (Corona) जास्त प्रमाणात प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे ग्रामीण भाग कोरोनामुक्त होण्यासाठी खास स्पर्धेची (Village corona free competitions) घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली आहे. कोरोनामुक्त गाव करणाऱ्या पंचायतीला ५० लाखांचा निधी दिला जाणार आहे.

कोरोनामुक्त (Corona free) गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना योजनांमध्ये प्राधान्य दिलं जाईल. यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामं मंजूर केली जातील.

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे, तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नुकतेच जनतेशी संवाद साधताना गावच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे. ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षीसे दिली जाणार आहे. यासाठी बक्षीसाची एकूण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल.

या स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपलं गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावं, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.



हेही वाचा

आम्हीही पैसे देतो, केंद्रानं लस द्यावी - किशोरी पेडणेकर

देवेंद्र फडणवीसांनंतर एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा