आधी गोळ्या आता गळ्यात गळा

 Pali Hill
आधी गोळ्या आता गळ्यात गळा
आधी गोळ्या आता गळ्यात गळा
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि खासदार संजय दिना पाटील यांच्यात दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळालं. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या पुढाकारामुळं आता या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटलाय. याबाबत सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांमधील वाद आता मिटला आहे आणि वॉर्ड अध्यक्षांच्या निवडीमुळे वाद झाला होता. ती निवड पक्षस्तरावर केली जाणार आहे. नवाब मलिक यांनीही पक्षस्तरावर वाद मिटला असल्याचं सांगत पोलीस केसबाबत तांत्रिक बाबी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिलीय. चेंबूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सभेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी हा गोळीबार केल्याचा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला होता. या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षाच्या दोन जेष्ठ नेत्यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्राने बघितला होता.

Loading Comments