'राज ठाकरेंकडून हुतात्मा सैनिकांचा अपमान'

  Vidhan Bhavan
  'राज ठाकरेंकडून हुतात्मा सैनिकांचा अपमान'
  मुंबई  -  

  नरिमन पॉइंट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी शनिवारी सकाळी राज ठाकरे आणि करण जोहर यांची बैठक झाली. या बैठकीत 'ऐ दिल है मुश्किल' हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी चित्रपट निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीत पाच कोटी रुपये जमा करण्याचं ठरलं. ही एक सेटलमेंट असल्याचं मत व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे या दोघांवरही निशाणा साधलाय. "ही सेटलमेंट म्हणजे हुतात्मा झालेल्या सैनिकांचा अपमान आहे," असं मलिक यांनी म्हटलंय.

  "राज ठाकरेंचा आजवरचा इतिहास पाहता ते आपली भूमिका सातत्यानं बदलताना दिसतात. हाती घेतलेला कोणताही मुद्दा पूर्ण न करता तो अर्ध्यावर सोडणं किंवा सेंटलमेंट करणं अशी त्यांची ओळख आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या निर्णयातून नवा पायंडा पाडलाय. महाराष्ट्रातील मनसेच्या इंजिनाला, भाजपकडून इंधन पुरवलं जाते हे आता उघड झालंय. मुख्यमंत्री फडणवीस हेच राज ठाकरे यांना नियंत्रित करतात. त्यामुळे भाजपा आणि मनसे या दोन्ही पक्षांचं साटंलोटंही स्पष्ट होतंय, असे आरोप मलिक यांनी केले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.