Advertisement

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्या एकाला अटक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावानं एका व्यक्तीनं मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला.

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्या एकाला अटक
SHARES

गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावानं एका व्यक्तीनं मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला. फोन करणाऱ्यानं अधिकाऱ्याशी एका बदलीबाबत भाष्य केलं. संभाषणादरम्यान, अधिकाऱ्याला संशय आला आणि त्याची पुष्टी करण्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या घरी म्हणजे सिल्व्हर ओकवर फोन केला.

यानंतर त्या अधिकाऱ्याला कळलं की राष्ट्रवादीचे प्रमुख घरी नाहीत आणि अशा प्रकारे कोणीतरी त्या अधिकाऱ्याला फोन करून शरद पवारांच्या फेक आवाजात संभाषण केलं.

याप्रकरणी अधिकाऱ्यानं अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबईच्या गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिकाऱ्यानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, फोन करणाऱ्याचा आवाज हा शरद पवारांच्या हुबेहूब कॉपी होता. गुरुवारी गुन्हा दाखल केल्यानंतर तपास खंडणीविरोधी कक्षाकडे सोपवण्यात आला आहे.

ताज्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पुण्यात एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. प्रकरण संवेदनशील असल्यानं पोलिसांनी अद्याप या प्रकरणी कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. अखेर, फोन करण्याचा उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा