खादी प्रदर्शनाची धूम

 Vidhan Bhavan
खादी प्रदर्शनाची धूम
खादी प्रदर्शनाची धूम
See all

नरिमन पॉइंट - मंत्रालयातील तीन दिवसीय खादी आणि हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शन, विक्री मेळाव्याला राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी भेट दिली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात वीसहून अधिक स्टॉल लावण्यात आले आहेत. यात हस्तकला व्यावसायिक, महिला बचत गट तसेच खादी उत्पादक सहभागी झाले असुन विविध उत्पादनांसह खाद्यपदार्थही उपलब्ध आहेत. तीन दिवसांपासून सुरू असलेले हे प्रदर्शन सर्वांना आकर्षित करण्यात सफल ठरले आहे. त्यामुळे हे प्रदर्शन आणखी काही दिवस सुरु राहणार आहे. बुधवारी मुख्य सचिव यांनी या प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली. यावेळी खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला ह्या उपस्थित होत्या.

Loading Comments