SHARE

मुंबई - कोपर्डी बलात्कारातील नराधमांना फाशी, मराठा समाजाला आरक्षण या मागण्यांसाठी बाइक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. सोमय्या मैदानावरून रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून या रॅलीला सुरुवात झालीय. ही रॅली सायन सर्कल, सायन रुग्णालय, माटुंगा सर्कल, दादर, परळ, लालबाग, भायखळा इथून छत्रपती शिवाजी टर्मिनल्स रेल्वे स्टेशनवर पोहचेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली जाईल. तसंच कोपर्डी घटनेतील पीडितेला श्रद्धांजली वाहून रॅलीची सांगता होईल.

मराठा मोर्चाप्रमाणं या बाइक रॅलीचं नेतृत्त्व महिलांकडे असेल. या वेळी वाहतुकीच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असेल. बाइक चालकांना हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. तर मागे बसलेल्या व्यक्तीनं भगवा फेटा परिधान केलाय. महिलांच्या बाइकवर काळा तर पुरुषांच्या बाइकवर भगवा झेंडा फडकतोय. रॅलीदरम्यान हॉर्न वाजवणं आणि घोषणाबाजी करणं यावर बंदी आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या