Advertisement

...अन्यथा दहा दिवसांनंतर पाणी न पिता आमरण उपोषण

१० दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा संभाजी पाटील यांनी दिला आहे. तर यावेळचं आंदोलन आधीच्या आंदोलनापेक्षा अधिक तीव्र असेल, यावेळी उपोषणादरम्यान पाणीही पिणार नाही. तर जोपर्यंत प्रत्यक्षात मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

...अन्यथा दहा दिवसांनंतर पाणी न पिता आमरण उपोषण
SHARES

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं आझाद मैदानावर सुरू असलेलं आमरण उपोषण अखेर १६ व्या दिवशी मागे घेण्यात आलं आहे. जलसंपदा मत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतलं आहे. मात्र त्याचवेळी १० दिवसांत आश्वासन पूर्ण झालं नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू. आधी पाणी पित आमरण उपोषण केलं होतं. यापुढे मात्र पाणी न पिताच आमरण उपोषण करू असा इशारा सकल मराठा समाजानं मुंबईत रविवारी एका पत्रकार परिषदेत दिला आहे.


१६ दिवस आमरण उपोषण 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्या ३९ मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत त्वरीत मिळावी आणि आंदोलकांवरील सर्व गुन्हे त्वरीत मागे घ्यावेत या मागण्यांसाठी आझाद मैदानावर तब्बल १६ दिवस आमरण उपोषण सुरू होतं. प्रा. संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली १७ जण आमरण उपोषणास बसले होते. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली असतानाही उपोषण मागे घेण्यास आंदोलक तयार नव्हते.


पुन्हा अांदोलन

अखेर शनिवारी गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावर जात उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली नि त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलन मागे घेतल्यानंतर रविवारी सकल मराठा समाजाकडून मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत १० दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा संभाजी पाटील यांनी दिला आहे. तर यावेळचं आंदोलन आधीच्या आंदोलनापेक्षा अधिक तीव्र असेल, यावेळी उपोषणादरम्यान पाणीही पिणार नाही. तर जोपर्यंत प्रत्यक्षात मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.


चक्का जाम अांदोलन

आमरण उपोषणाबरोबरच मुंबई ठप्प करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्यास उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव मुंबईकडे धाव घेतील आणि आंदोलन तीव्र केली जाईल. वर्षा बंगला, आझाद मैदान, मंत्रालय अशा सर्वच परिसरात चक्का जाम करण्यात येईल, असंही यावेळी सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता सरकार सकल मराठा समाजाच्या मागण्यांवर कधी निर्णय घेतं हेच पाहणं महत्वाचं ठरेल.



हेही वाचा - 

१६ दिवसानंतर मराठा आंदोलकांचं उपोषण मागे!

काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी सज्जः अशोक चव्हाण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा