मराठा क्रांती (मुक) महामोर्चा बैठक

 Bhandup
मराठा क्रांती (मुक) महामोर्चा बैठक

कोकणनगर - राज्यभरातील मोर्चांच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढल्यानंतर येत्या महिन्यात मुंबईत आयोजित केलेल्या मराठा क्रांती (मुक) महामोर्चाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून स्वयंसेवक नोंदणी आणि महामोर्चाची माहीती देण्यासाठी भांडुपमध्ये नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भांडुप पश्चिमेकडील शिवाजी तलाव येथे असलेल्या पराग विद्यालयामध्ये रविवारी २ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता ही नियोजन बैठक होणार आहे. भांडुपमधील तमाम मराठा समाजातील बांधव, भगिनींनी या बैठकीला उपस्थित रहावे, असे अावाहन आयोजक योगेश तावडे यांनी केले आहे.

Loading Comments