Advertisement

मराठा मोर्चा पुन्हा उपसणार आंदोलनाचं हत्यार


मराठा मोर्चा पुन्हा उपसणार आंदोलनाचं हत्यार
SHARES

राज्य सरकारने नोव्हेंबरपर्यंत आरक्षणावर निर्णय जाहीर न केल्यास १ डिसेंबरपासून पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसण्याचा इशारा सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाने मंगळवारी दिला.


मोर्चेकरी नाराज

मराठा क्रांती ठोक मोर्चाची आढावा बैठक मंगळवारी दुपारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. या बैठकीत आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यावर चर्चा करण्यात आली. मूक मोर्चानंतर, ठोक मोर्चाद्वारे राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडूनही राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने सरकारच्या भूमिकेवर मोर्चेकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.सरकारला इशारा

त्यामुळे शासनाने कालमर्यादा ठरवून येत्या नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करावं. त्याचप्रमाणे २ ते ३ दिवसांत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अन्यथा १ डिसेंबरपासून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीनंतर मराठा मोर्चाने राज्य सरकारला दिला.


राज्याच्या पोलिस महासंचालकांना मराठा मोर्चातील आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती करणारं पत्र आम्ही दिलं आहे. या विनंतीनुसार येत्या २ ते ३ दिवसांत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले नाही, तर आम्हाला आंदोलनाची पुढची दिशा ठरवावी लागेल. ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहे, त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. राज्य सरकारने दिलेलं अश्वासन पाळून नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं. अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन सुरु करू.
- आबासाहेब पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चाहेही वाचा-

हिंसक मराठा आंदोलकांवर कारवाई करा! उच्च न्यायालयात याचिका दाखल

मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभर जेलभरोRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा