मराठा लोकप्रतिनिधींनो राजीनामे द्या

 Mumbai
मराठा लोकप्रतिनिधींनो राजीनामे द्या
Mumbai  -  

 मुंबई - संभाजी ब्रिगेडने सर्व मराठा लोकप्रतिनीधींना राजीनामा देण्याचे आवाहन केले आहे. संभाजी ब्रिगेडसह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांची पत्रकार परिषद गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झाली. या पत्रकार परिषदेत सर्व मराठा लोकप्रतिनिधींना उद्देशून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रचे प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि कोपर्डीसह इतर मागण्यांबाबत सर्वपक्षीय मराठा मंत्री, आमदार आणि खासदार यांनी तातडीची विशेष बैठक बोलवावी, अन्यथा या सर्वांनी राजीनामे द्यावेत".

भानुसे पुढे म्हणाले,"कोपर्डी घटनेचा निषेध करण्यासाठी विविध मराठा संघटना एकत्र येवून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबाद येथे केली. त्या मोर्चाला सर्व मराठा समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे आता ठिकठिकाणी असे अतभुतपूर्व मोर्चे निघत आहेत.परंतु, या मोर्चाचा राजकीय लाभ कसा घेता येईल, यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. आम्हीच कसे मराठ्यांचे कैवारी आहोत, हे दाखवत आहेत. पण जर का खरोखरच या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाची काळजी वाटत असेल तर त्यांनी या मुद्द्यावर लवकरात लवकर यावर एक विशेष अधिवेशन बोलवावे. अन्यथा पदाचे राजीनामे द्यावेत.

Loading Comments