Advertisement

मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

पण जरांगे मुंबई गाठण्यावर ठाम

मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
SHARES

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आझाद मैदान पोलिसांनी या प्रकरणी जरांगेंना उपोषणासाठी आझाद मैदान अपुरे असल्याचे नमूद केले. त्यांना नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर 29 मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदानात उपोषणाला बसण्याची सूचना केली आहे.

पण त्यानंतरही जरांगे आपल्या आझाद मैदानातील मुक्कामावर ठाम असून, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना आपल्या गाड्यांची तोंडे मुंबईच्या दिशेने वळवण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान, सकाळी कुणीतरी अधिकारी आले आणि झोपेच्या नादात माझी सही घेतली, कोर्टाचे कागदपत्रं असल्याचं सांगत त्यांनी माझी सही घेतली, पण त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी असल्याचा गंभीर इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला. लोणावळ्यातून आज मनोज जरांगे हे वाशीकडे निघाले असून पोलिसांनी त्यांना मार्ग बदलण्याची विनंतीही त्यांनी मान्य केली आहे. मनोज जरांगेंचा मुक्काम आज वाशीमध्ये असणार आहे. 

यासोबतच मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस देण्यात आली आहे. तसेच, मराठा आंदोलनामुळे विपरीत परिणाम होवून मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्था कोलमडणार असल्याचे नोटीसमधून सांगण्यात आले आहेत.

आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत त्यांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही, त्यामुळे आंदोलन करण्यासाठी खारघरमधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान संयुक्तिक राहील असे पोलिसांकडून नोटीसमध्ये सांगण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे यांना पोलिसांकडून परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 



हेही वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'या' तारखेला अयोध्येला भेट देऊ शकतात

16 एप्रिल 2024 ला लोकसभा निवडणुका होणार का?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा