मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मराठा महामोर्चा

 Pali Hill
मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मराठा महामोर्चा

मुंबई - मराठा क्रांती (मूक) मोर्चा समितीनं मुंबईत मोटारसायकल रॅली काढली होती. पण त्यानंतरही मागण्यांचा मुद्दा तसाच राहिलाय. त्यामुळे नियोजनासाठी समितीनं 24 नोव्हेंबरला नायगाव क्रॉस रोड येथील भारतीय क्रीडा केंद्रात सभा घेतली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात 14 डिसेंबर 2016 रोजी नेण्यात येणाऱ्या मूक मोर्चासाठी विशेष गाडी बुक करण्याचा निर्णय झाला असून त्यासाठी दोन दिवसांत नावनोंदणी आणि तिकीट शुल्क समितीकडे जमा करायचं आहे. ही गाडी 13 डिसेंबरला रात्री 9 वा. सीएसटीहून सुटेल.

बैठकीतले आणखी काही निर्णय असे –

- चित्र आक्रोश प्रदर्शन. विभागीय प्रतिनिधींनी शाळांतून कार्यशाळा घ्यायची. त्यासाठी मुदत 8 डिसेंबर ठरली. या चित्रांचं प्रदर्शन शिवाजी पार्क, ठाणे अशा वर्दळीच्या भागांमध्ये 11 डिसेंबरला भरवणे, निवडक चित्रांचं पुस्तक करून 14 डिसेंबरला नागपूर मोर्चात आमदारांना भेट देणे.

- या मूक मोर्चाची माहिती प्रत्येक मराठ्याला होण्यासाठी स्थानकांबाहेर फलक लावून तिथल्या प्रतिनिधीचा संपर्क क्रमांक देणे.

- सोशल मीडियावरच्या अफवांवर विश्वास ठेवून हिंसक होऊ नका. संयम ठेवा. शिस्त बाळगा, असं आवाहनही सभेत करण्यात आलं.

14 डिसेंबरला मागण्या मान्य न झाल्यास समितीच्या वतीने मुंबईत महामोर्चा काढू, असा इशारा राजन घाग यांनी दिला. या वेळी सुभाष भोसले, वैभव वाबळे, पंकज घाग, प्रवीण गोंजारी, हरीश ढगे आदीही उपस्थित होते.

Loading Comments