पुन्हा बरळले काटजू

 Pali Hill
पुन्हा बरळले काटजू

मुंबई - आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणारे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा एकदा नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. काटजू यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एक ब्लॉग लिहिलाय. त्या ब्लॉगमध्ये त्यांनी ‘रास्कल बाळ ठाकरे’ असा उल्लेख केलाय. बाळ ठाकरे हे सर्वाधिक धूर्त नेता होते. ते नेहमी गुंडगिरी करत असंही त्यांनी म्हटलंय. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधीसमवेत देशातील दिग्गज लोक सहभागी झाले होते. परंतु मी गेलो नव्हतो. काटजू यांनी त्यावेळी इंग्रजी वृत्तपत्र ‘द हिंदू’मध्येही लेख लिहिला होता. तोच लेख पुन्हा एकदा त्यांनी ब्लॉगवर प्रसिद्ध केलाय. काटजू यांनी ‘व्हाय आय कान्ट पे ट्रिब्यूट टू बाळ ठाकरे’ हा लेख लिहिलाय. त्यात बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून परराज्यातून मुंबईत राहण्यास आलेल्या लोकांविरोधात हिंसाचार कसा केला याचा उल्लेखही त्यांनी केलाय.

बाळासाहेब ठाकरे आ्णि शिवसेनेचे कार्य राज्यघटनेच्या विरोधी होते याचा उल्लेखही त्यांनी स्वत:च्या फेसबुक वॉलवर केलाय. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता मार्कंडेय काटजू यांच्या फेसबुक पोस्टवर त्यांनी संताप व्यक्त केलाय. मार्कंडेय काटजू हा माणूस बास्टर्ड असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली.

Loading Comments