Advertisement

मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीला विधानभवनात सुरुवात


मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीला विधानभवनात सुरुवात
SHARES

मराठा आरक्षणासाठी राज्यभर पेटलेलं आंदोलन शमवण्यासाठी सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा, ही मागणी अाता जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागल्यानंतर भाजप सरकारवरही सर्वपक्षीय नेत्यांकडून दबाव येऊ लागला अाहे. त्यामुळे मराठा अारक्षणाबाबत तोडदा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी विधानभवनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली आहे.


मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते काकासाहेब शिंदे या तरुणाचा नदीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. विधानभवनात दुपारी २ वाजल्यापासून बैठकीला सुरुवात झाली अाहे. या बैठकीत सभापती, अध्यक्ष यांच्यासहित सर्व गटनेत्यांची उपस्थिती आहे.


गुरुवारी रात्री झाली चर्चा

आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असं विधान मराठा आरक्षण समितीचे तत्कालिन प्रमुख नारायण राणे यांनी शुक्रवारी केलं होतं. त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सेवासदन या सरकारी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार या नेत्यांची मराठा आरक्षणाबाबत गुरुवारी रात्री चर्चा झाली होती. 


तुटेपर्यंत ताणू नये

राज्यातील मराठा आरक्षणासाठी होणारे आंदोलन थांबवण्यात आले तर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असं महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष नारायण राणे यांनी शुक्रवारी सांगितलं. तोडफोड आणि जाळपोळ यांसारख्या हिंसक आंदोलनामुळे राज्याचंच नुकसान होईल, सरकार आरक्षण देण्यासाठी सक्षम आहे, त्यामुळे सरकारशी चर्चा करायला हवी, असं राणे यांनी सांगितलं. परिणामी आता या आरक्षणाच्या मुद्द्यांसाठी हालचालींना वेग येताना दिसत आहे.


हेही वाचा -

हिंसक आंदोलन थांबवल्यावरच आरक्षणावर विचार- नारायण राणे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा