Advertisement

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक २०२० पर्यंत उभारणार - मुख्यमंत्री


डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक २०२० पर्यंत उभारणार - मुख्यमंत्री
SHARES

दादर येथील चैत्यभूमीत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांचे अांतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याबाबत शासन गंभीर अाहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीचं हस्तांतरण पूर्ण झालं असून स्मारकाचं काम वेगानं सुरू करण्यात येणार अाहे. हे स्मारक २०२० पर्यंत उभारणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं.


काय म्हणाले मुख्यमंत्री?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं होण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. २५ एप्रिल २०१८ रोजी साडेबारा एकर जमिनीचं हस्तांतरण होऊन त्यावर शासनाच्या नावाची नोंद झाली आहे. यातील पाच एकरातील भाग हा सीआरझेड अंतर्गत येतो. मात्र या परिसरात हे बांधकाम येत नाही. यालाही केंद्र शासनाची मान्यता घेण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. स्मारकाच्या बांधकामात पैशांची कोणतीही अडचण नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गरज पडल्यास, आणखी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.


अाराखड्याचं सादरीकरण

स्मारकाचं काम हे आराखड्याप्रमाणे व संकल्पनेनुसार करण्यात येणार असून विधिमंडळाचे सदस्य आणि सर्व आंबेडकरी संघटनांच्या प्रमुख नेत्यांसमोर याबाबत सादरीकरण करण्यात येईल. त्यांच्या सूचनेनुसार बदल करण्यात येतील. शिवाय स्मारकाचं दर्शन सी लिंकवरूनही व्हावं, अशी व्यवस्थाही करण्यात येईल. यासाठी नियमित पाहणी करण्यात येणार आहे.


हेही वाचा -

डाॅ. आंबेडकर स्मारकाला महिन्याभरात सुरूवात- मुख्यमंत्रीRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement