Advertisement

मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार?


मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांना दिलासा मिळणार?
SHARES

गिरगाव - एमएमआरसी गिरगावातील प्रकल्पग्रस्त रहिवाश्यासाठी पुनर्वसन योजना गिरगावातच बांधणार, ५०० मीटरच्या आत पुनर्वसन होणार, व्यावसायिक गाळेधारकांना २०% अधिक जागा देणार, प्रकल्पबाधीत रहिवाश्यांना पूढील ४ वर्षांचं भाडं आगाऊ देणार अशा रहिवाश्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याचं आश्वासन जिल्हाधिकारी आश्विनी भिडे यांनी दिलंय. मुंबईला गती देण्यासाठी मेट्रो 3 प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. पण सरकारच्या या निर्णयाला गिरगावातील काही जणांचा विरोध असल्यामुळे गिरगावात मेट्रो तीन प्रकल्पाचे बांधकाम स्थानिक रहिवाश्यांनी बंद पाडल्यानंतर मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी गिरगावात जाऊन रहिवाश्याची व शिवसेनेच्या पदाधिका-याची भेट घेतील होती. तरीही कोणता तोडगा निघाला नसल्यामुळे शनिवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रमुख अश्विनी भिडे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई आणि गिरगावातील प्रकल्पबाधीत रहिवासी व गिरगावातील शिवसैनिक बैठकीला उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा