Advertisement

दूध आंदोलन, महाजन-शेट्टी बैठक सकारात्मक, तोडगा मात्र नाही!

दूधकोंडी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी आणि जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात अंधेरीतील नंदगिरी गेस्ट हाऊसवर बैठक पार पडली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी तोडगा मात्र निघालेला नाही. आता यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

दूध आंदोलन, महाजन-शेट्टी बैठक सकारात्मक, तोडगा मात्र नाही!
SHARES

राज्यात सुरू असलेल्या दूधकोंडी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी आणि जलसंपदा मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यात अंधेरीतील नंदगिरी गेस्ट हाऊसवर बैठक पार पडली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असली तरी तोडगा मात्र निघालेला नाही. आता यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

याशिवाय गुरुवारी शेट्टींनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊ नये, शांततेच्या मार्गानं आंदोलन करावं, असं आवाहन केलं. 


मुख्यमंत्र्यांसोबत करणार चर्चा

दूधप्रश्न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असून खासदार राजू शेट्टी यांचे प्रस्ताव सरकार मान्य करू शकेल. या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार असून त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असं महाजन यांनी स्पष्ट केलं.

सरकारकडून चर्चेसाठी ऊशीर झालेला नसून आपण सुरुवातीपासूनच राजू शेट्टींच्या संपर्कात होतो. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून दोघांनाही शेतकऱ्यांचा फायदा हवा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राजु शेट्टींच्या मागण्या समजून घेतल्या असल्याचं यावेळी महाजन म्हणाले.


मात्र आंदोलन थांबवणार नाही

सकारात्मक चर्चा झाली असली तरी जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत दूधकोंडी आंदोलन सुरूच राहणार. आमच्या मागण्या पुर्ण करणार असतील तर आम्हाला बैठकीला नाही बोलावलं तरी चालेल. मात्र जोपर्यंत मागण्या पुर्ण होत नाही तोवर आंदोलन थांबवणार नाही.


शेट्टींनी घेतली पत्रकार परिषद

खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांना न घेता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं. याचबरोबर कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो मग दूध उत्पादकांना का नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.  आपल्या राज्यातून बाहेरील राज्यांना दूध जायला हवं. इतर राज्यात दुधाला अनुदान मिळतं, मग आमच्या शेतकऱ्यांना अनुदान का नाही? असा सवाल करत   शेतकऱ्यांना किमान 25 ते 27 रुपये भाव मिळायलाच पाहिजे, यासाठी दूधकोंडी आंदोलन पुकारलं असून हे सरकारला लक्षात आणून दिलं आहे.  सरकारला निर्णय घेण्यासाठी वेळ देऊ. पण यावर दीर्घकालीन मार्ग निघावा, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.


हेही वाचा -

दूध एक्सप्रेस रद्द, मुंबईत येणारं दूध आलंच नाही

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा