Advertisement

दूध एक्सप्रेस रद्द, मुंबईत येणारं दूध आलंच नाही


दूध एक्सप्रेस रद्द, मुंबईत येणारं दूध आलंच नाही
SHARES

दुधकोंडी आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस असून हे आंदोलन चिघळतच चाललं आहे. अद्याप मुंबईला या आंदोलनाची झळ बसलेली नाही. मात्र, हे आंदोलन असचं सुरू राहिलं तर मुंबईत दुधबाणी निर्माण होऊ शकते. हीच शक्यता लक्षात घेत राज्य सरकारनं गुजरातवरून दूध एक्सप्रेसनं ४ लाख ४० हजार लिटर दूध मुंबईसाठी मागवलं होतं. पण हे दूध काही मुंबईत पोहचू शकलेलं नाही. आंदोलनाला घाबरलेल्या सरकारनं रेल्वेनं दूध पाठवण्याचा विचार रद्द केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी आंदोलनाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


डहाणू स्थानकावर ठिय्या

राजू शेट्टी यांना चकवा देत दूध एक्सप्रेसनं हे दूध मुंबईत आणण्यात येत होतं. पण याची माहिती मिळताच गुजरात सीमेवर मंगळवारी रात्रभर ठाण मांडून बसलेल्या शेट्टींनी सकाळी थेट डहाणू रेल्वे स्थानकावर धाव घेतली. तिथंच ते स्थानकावर कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडून बसले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ५९४४० अहमदाबाद-मुंबई सेंट्रल पॅसेंजरला १० डबे जोडत दूध आणण्यात येणार होतं. त्यानुसार १२ वाजण्याच्या ५९४४० पॅसेंजर डहाणू स्थानकावर पोहचली. पण त्या ट्रेनला दुधाचे डबेच नव्हते. त्यामुळं प्रवाशांना कोणताही त्रास न देता पॅसेंजर मुंबईच्या दिशेनं सोडून देण्यात आली.


...तर महामार्गांवर जनावरं सोडू

पश्चिम रेल्वेनं अधिकृत ट्विट करत ४४ हजार लीटरच्या १० डब्यांमधून दूध मुंबईकडे येणार असल्याचं सांगितलं होतं. असं असताना दुध आलंच नाही. म्हणजेच सरकार, रेल्वे आमच्या आंदोलनाला घाबरल्याची प्रतिक्रियाही शेट्टी यांनी दिली आहे. तर दुधकोंडी आंदोलनाविषयी चर्चा करण्यासाठी अद्यापर्यंत सरकारकडून कोणतंही बोलावणं आलं नसल्याचं सांगत यापुढे आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही त्यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिला आहे. तर गुरूवारी राज्यातल्या सर्व महामार्गांवर जनावरं सोडून देऊ, मग करा आमच्याबरोबर त्यांच्यावरही कारवाई असा इशाराही त्यांनी दिला आहे.



हेही वाचा -

'नीट'मध्ये परराज्यातील मुलांवर बारीक लक्ष - राज ठाकरे

माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा