Advertisement

'नीट'मध्ये परराज्यातील मुलांवर बारीक लक्ष - राज ठाकरे


'नीट'मध्ये परराज्यातील मुलांवर बारीक लक्ष - राज ठाकरे
SHARES

वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परिक्षेत स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद इतर राज्यांमध्ये असताना महाराष्ट्रातच नीटमध्ये स्थानिकांना प्राधान्य का नाही, असा खडा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी राज्य सरकारला केला आहे. नीटमध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जात अाहे की नाही याकडं आमचं बारीक लक्ष आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तर ही धमकी समजायची असेल तर समजा असं म्हणत नीटवरून सरकारला टार्गेट करण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे.


राज्याचा कारभार केंद्रातून

मंगळवारी पुण्यात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली.  यावेळी त्यांनी नीटवरून सरकारला इशारा दिला आहे. नीटमध्ये नेहमीच सरकार गोंधळ घालतं. दरवर्षी विद्यार्थी माझ्याकडे येतात. पण सरकार मात्र याकडं दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी नीटमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचा मुद्दा यावेळी उचलून धरला. तर राज्यात यासंबंधी कायदा होत असेल तर राज्यातही असा कायदा करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.  नीटवरून राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे. राज्याचा कारभार राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकार चालवतं, राज्य सरकार सांगकामं असून केंद्र सरकार जे सांगेल तेच राज्य सरकार करतं असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.


दूध अांदोलनाला पाठिंबा

सध्या राज्यभर दुधकोंडी आंदोलन सुरू असून या आंदोलनाविषयी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांना विचारलं असता, त्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दिला आहे. दुधाला योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे असं सांगतानाच दूध आंदोलनाबाबत सरकारला आधीच माहिती असताना योग्य ती पावलं का उचलली गेली नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे. तर सरकार या प्रश्नाकडं दुर्लक्ष करत असल्यानंच आंदोलन चिघळत असून त्यात जनता होरपळत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


राम मंदिर झालं पाहिजे

प्रसारमाध्यमांनी राम मंदिराविषयी राज ठाकरे यांना प्रश्न केला असता, त्यांनी यावर आपलं स्पष्ट मत देत राम मंदिर झालं पाहिजे असं सांगितलं. पण त्याचवेळी राम मंदिर फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून नको अशी स्पष्ट भूमिका ही त्यांनी मांडली. तर चार वर्षात काहीच विकास झाला नाही म्हणून राम मंदिराची आठवण झाल्याची म्हणत त्यांनी भाजपावरही हल्ला चढवला.


किल्ल्यांची डागडुजी करा

मंगळवारी विधानसभेत ज्या शिवस्मारकाच्या उंचीवर प्रचंड गोंधळ झाला त्या विषयालाही राज ठाकरे यांनी यावेळी हात घातला. स्मारक करण्याएेवजी गडकिल्ल्यांच्या डागडुजीकडं लक्ष द्या असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. महत्त्वाचं म्हणजे मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात गेल्या आठवड्याभरापासून मनसे कार्यकर्त्यांकडून खड्ड्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय फोडणं असो कि मंत्रालयासमोरचा रस्ता खोदणं, मसने कार्यकर्ते अाक्रमक भूमिका घेत आहेत. तर या आक्रमक मनसे कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाईही होत आहे.


कायदेशीर भूमिका घेणार

 पुण्यातील पत्रकार परिषदेत खड्ड्याविषयी राज ठाकरे काय बोलणार हा महत्त्वाचा विषय होता. त्यानुसार त्यांनी खड्ड्यांचा विषयही यावेळी घेतला. रस्त्यात पडून हातपाय मोडताहेत, बळी जाताहेत. अशावेळी खड्ड्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई नाही. पण जे खड्ड्याविरोधात आंदोलन करताहेत त्यांच्याविरोधात मात्र थर्ड डिग्री वापरली जात असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी याविरोधात कायदेशीर भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

माणिकराव ठाकरेंचा उपसभापतीपदाचा राजीनामा

दूधकोंडीचा तिसरा दिवस, दूध एक्स्प्रेस रोखण्यासाठी शेट्टी डहाणूकडे रवाना




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा