गृहराज्यमंत्र्यांना हायकोर्टाची नोटीस

 Pali Hill
गृहराज्यमंत्र्यांना हायकोर्टाची नोटीस

मुंबई - बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना हायकोर्टाने नोटीस बजावलीय. रणजीत पाटील यांनी मुलीच्या नावे बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याची तक्रार विक्रांत काटे यांनी अकोला एसीबीला केली होती. या तक्रारीनंतर एसीबीने चौकशी करून रणजीत पाटील यांना क्लिनचीट दिली होती. एसीबीने दिलेल्या क्लिनचिटला काटे यांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. त्या आव्हानानंतर मंगळवारी हायकोर्टाने त्यांना नोटीस बजावलीय. दोन वर्षांपूर्वीच्या या प्रकरणाला एसीबी आणि रणजीत पाटील यांना उत्तर देण्याचे निर्देश देण्यातही आले आहेत.

Loading Comments