मनोरा आमदार निवासाची 2017 मध्ये फेरबांधणी

  Vidhan Bhavan
  मनोरा आमदार निवासाची 2017 मध्ये फेरबांधणी
  मुंबई  -  

  नरिमन पॉईंट - मनोरा आमदार निवासाच्या फेरबांधणीबाबत गुरुवारी महत्त्वपूर्ण  बैठक झाली. या बैठकीत विधानभवन आणि नॅशनल बिल्डींग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड (NBCC) यांच्यात दिवाळीपूर्वी सामंजस्य करार करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. मनोरा आमदार निवासाच्या चारही इमारती टप्प्याटप्प्याने पाडून सुनियोजित इमारती नव्याने बांधण्यात येतील. सामंजस्य करार झाल्यावर जानेवारी 2017 मध्ये बांधकाम सुरू होईल.

  या बैठकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सचिव उत्तमसिंग चव्हाण, NBCC नवी दिल्लीचे मुख्य महाव्यवस्थापक अलोक रस्तोगी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. जवंजाळ आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सामंजस्य करारानंतर बांधकामास सुरुवात करावी, पार्किंग, सुरक्षा, उपहारगृह, सभागृह आदी व्यवस्था उच्च दर्जाच्या असाव्यात. आमदार निवासातील निवासी कक्षाची रचनाही सुसज्ज आणि रेखीव असावी, अशा सूचना नाईक-निंबाळकर आणि बागडे यांनी या वेळी दिल्या.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.