‘असं’ आहे मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रोचं रुप

मुंबईच्या पोटातून जाणाऱ्या मेट्रो ३ च्या डब्याचं अनावरण नुकतंच करण्यात आलं. ‘मुंबई अॅक्वा लाइन’ असं नामकरण या मेट्रो मार्गाचं करण्यात आलं आहे.

  • ‘असं’ आहे मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रोचं रुप
  • ‘असं’ आहे मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रोचं रुप
  • ‘असं’ आहे मुंबईच्या पोटातून धावणाऱ्या मेट्रोचं रुप
SHARE

मुंबईच्या पोटातून जाणाऱ्या मेट्रो ३ च्या डब्याचं अनावरण नुकतंच करण्यात आलं. ‘मुंबई अॅक्वा लाइन’ असं नामकरण या मेट्रो मार्गाचं करण्यात आलं आहे. या प्रोजेक्टअंतर्गत ८ डब्यांच्या ३१ मेट्रो ट्रेन बनवण्यात येत आहेत. 

या डब्यांची रंगसंगती तसंच डब्यांची आंतरबाह्य डिझाईन ‘मुंबई अॅक्वा लाइन’ या नावाला साजेशी अशीच आहे. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लि. कडून डब्याच्या निर्मितीचं काम ‘अॅलस्टाॅम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड’ या कंपनीला देण्यात आलं आहे.

 

मेट्रो ३ च्या कुलाबा- वांद्रे-सीप्झ या ३३.५ किमी अंतरादरम्यान या मेट्रो ट्रेन धावतील. हा मार्ग भुयारी असल्याने मुंबईकरांना या मार्गाचं विशेष आकर्षण आहे. या मेट्रो मार्गावर एकूण २७ स्थानकं असतील. 


या स्थानकांमध्ये कफ परेड, विधानभवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल मेट्रो, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिद्धिविनायक, दादर, शीतलादेवी, धारावी, बीकेसी, विद्यानगरी, सांताक्रूझ, डोमेस्टिक एअरपोर्ट, सहार रोड, इंटरनॅशनल एअरपोर्ट, मरोळ नाका, एमआयडीसी, सीप्झ या स्थानकांचा समावेश आहे.  हेही वाचा-

मेट्रो ३ प्रकल्पाच्या ३२ भुयारी टप्प्यांपैकी २२ पूर्ण

मेट्रोच्या १०० टनाच्या गर्डरखाली चिरडून एक ठारसंबंधित विषय
ताज्या बातम्या