मनसेने पाकिस्तानी कपडे जाळले

Malad West
मनसेने पाकिस्तानी कपडे जाळले
मनसेने पाकिस्तानी कपडे जाळले
मनसेने पाकिस्तानी कपडे जाळले
मनसेने पाकिस्तानी कपडे जाळले
मनसेने पाकिस्तानी कपडे जाळले
See all
मुंबई  -  

मालाड पश्चिम लिंक रोड येथील इनॉर्बिट मॉलमधील एच अॅण्ड एम दुकानातील पाकिस्तानी निर्मितीचे कपडे मनसे कार्यकर्त्यांनी रविवारी जाळले. मिळालेल्या माहितीनुसार इनॉर्बिट मॉलमधील एच अॅण्ड एम दुकानात पाकिस्तानी निर्मितीच्या कपड्यांची विक्री होत असे. याची माहिती मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष नयन कदम यांना मिळाली. 

अखेर रविवारी शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन त्यांनी दुकानात धडक मारत पाकिस्तानी कपडे जाळून टाकले. यावेळी मनसेच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाकिस्तान आमच्या जवानांना मारत आहे. पाकिस्तानच्या कोणत्याही वस्तू आम्ही मुंबईत विकू देणार नसल्याचे नयन कदम यांनी सांगितलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.