SHARE

मुंबई - पुरोगामी राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी

अचानक आपली निशाणी रेल्वेचे इंजिनाची दिशा बदलेली आहे. हा बदल का करण्यात आला आहे याबद्दल मनसे नेत्यांनी मौन बाळगले आहे. पूर्वी इंजिनाची दिशा डावीकडून उजवीकडे केली होती ती बदलून पुन्हा उजवीकडून डावीकडे इंजिन धावू लागले. या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी इंजिनची दिशा बदलून काही होत नाही, लोकशाहीनुसार एका पक्षानं काम करावं, गुंडागर्दी बंद करावी असा सल्ला दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या निर्णयावर टीका केली की, राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असल्याचं राज ठाकरे यांना माहीत पाहिजे. त्यामुळे त्यांनी कायदा पाळावा अशी अपेक्षा आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या