Advertisement

''येत्या ११ डिसेंबरला…'',अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी राज्याच्या समुद्रकिनाऱ्यासाठी जनतेला साद घातली आहे.

''येत्या ११ डिसेंबरला…'',अमित ठाकरेंचं राज्यातील जनतेला आवाहन
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी राज्याच्या समुद्रकिनाऱ्यासाठी जनतेला साद घातली आहे. अमित ठाकरेंचा एक व्हिडीओ मनसे पदाधिकाऱ्यांकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये अमित ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीविषयी अमित ठाकरेंनी या व्हिडीओमध्ये चिंता व्यक्त केली असून त्यासाठी आता फक्त सरकारवर अवलंबून न राहाता आपल्यालाच जबाबदारी घेणं गरजेचं आहे, असं देखील अमित ठाकरेंनी म्हटलं आहे.

“मी तुमच्यासमोर मनातला महत्त्वाचा मुद्दा घेऊन येतोय. तो म्हणजे आपले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुरक्षित करणं.. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या समुद्रकिनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं की परदेशातले समुद्रकिनारे इतके स्वच्छ आणि सुंदर का असतात? आणि तसे आपल्या राज्यातले समुद्रकिनारे का नसतात? आपले समुद्रकिनारे इतके अस्वच्छ आणि भकास का दिसतात? त्यामुळं आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबवायला हवा”, असं अमित ठाकरे यांनी म्हटलं.


“महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेद्वारे मुंबईतील दादर किनाऱ्यावर सलग साडेचार वर्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचा कायापालट घडवून आणला. आता अशीच मोहीम मनसे आख्ख्या महाराष्ट्रात राबवणार आहे. राज्यातल्या ४० पेक्षा जास्त समुद्रकिनाऱ्यांवर येत्या ११ डिसेंबरला सकाळी १० ते दुपारी १ च्या मध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे”, असं अमित ठाकरेंनी सांगितलं.

“तुम्हालाही आपल्या जवळचे समुद्रकिनारे स्वच्छ असावेत असं वाटत असेल, तर तुमच्या जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन तुम्ही या मोहिमेत सहभागी होऊ शकता”, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा