Advertisement

राज ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना, म्हणून...

राज ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

राज ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना, म्हणून...
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. राज ठाकरेंनी खबरदारी म्हणून आगामी दहा दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती आहे.

राज ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर तातडीनं इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांचे कोरोना चाचणी अहवाल येणे बाकी आहे. त्याचा अहवाल आज सायंकाळी किंवा उद्या सकाळी येऊ शकतो.

सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडून पुढील १० दिवसातील सर्व कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंनी त्यांच्या सर्व भेटी रद्द केल्या आहेत, अशी माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यातील १० मंत्री आणि २० नेत्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. आज मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर, राष्ट्रावादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांना देखील कोरोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी म्हटलं आहे की, महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णांची दिवसभरातील संख्या २० हजारांच्यावर गेल्यास मुंबईत लॉकडाऊन करावंच लागेल.



हेही वाचा

BMC Election 2022 : मुंबई महानगरपालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा