Advertisement

"बाबरी मशिदीची एक वीट माझ्याकडे आली, आता राम मंदिराची..." - राज ठाकरे

बाबरीची वीट संग्रही आल्यानंतर राज ठाकरे यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे.

"बाबरी मशिदीची एक वीट माझ्याकडे आली, आता राम मंदिराची..." - राज ठाकरे
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी 32 वर्ष जपून ठेवलेली बाबरी मशिदीची वीट भेट दिली आहे.

बाबरी मशीद पाडली त्यावेळी बाळा नांदगावकर हे कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते, मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर तिथे ज्या वीटा होत्या, त्यातील दोन वीटा बाळा नांदगावकर सोबत घेऊन आले होते. त्यातील एक वीट त्यांनी स्वत:कडे ठेवली. तर, दुसरी वीट राज ठाकरे यांना भेट म्हणून दिली आहे. बाबरीची वीट संग्रही आल्यानंतर राज ठाकरे यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे.

श्रीरामाच्या कृपेने लवकरच...

"२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत श्रीराम मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. तमाम हिंदूंचं स्वप्न पूर्ण झालं. अयोध्येत राममंदिर व्हावं ही स्व. बाळासाहेबांची आणि लाखो कारसेवकांची तीव्र इच्छा होती जी पूर्ण झाली. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षातील माझे ज्येष्ठ सहकारी बाळा नांदगावकर ह्यांनी मला अयोध्येत कारसेवकांनी ज्या बाबरी मशिदीचा ढाचा उध्वस्त केला, त्यातली एक वीट मला भेट दिली. ही वीट ही परकीय आक्रमकांना खूप शतकं सहन केल्यानंतर दिलेल्या उत्तराचं प्रतीक आहे, असं मला वाटतं. असो. पण ही वीट आज माझ्या संग्रही आली, आता राममंदिर ज्या विटांमधून उभं राहतंय, त्यातली एक वीट देखील माझ्या संग्रही असावी अशी माझी इच्छा आहे. श्रीरामाच्या कृपेने लवकरच ती माझ्या संग्रही येईल, ह्याची मला खात्री आहे", असे राज ठाकरे म्हणाले.



हेही वाचा

सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांनी आरक्षण वाचवण्यावर फोकस करावं - छगन भुजबळ

मनोज जरंगे पाटील 10 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा