Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा राज्यपालांच्या भेटीला

राज ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कोणत्या मुद्द्यावरून काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेसुद्धा राज्यपालांच्या भेटीला
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) गुरूवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (maharashtra governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेणार आहेत. राज्यपाल कोश्यारी यांचं निवासस्थान असलेल्या राजभवन इथं ही भेट घेणार आहेत. या भेटीचं कारणं अद्याप गुलदस्त्यातच आहे. राज्यपालांच्या भेटीआधी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यामुळं राज ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कोणत्या मुद्द्यावरून काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरेंसोबतच्या बैठकीसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश जाधव, शिरीष सावंत, रिटा गुप्ता यांसह इतर पदाधिकारी कृष्णकुंजवर दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकहिताच्या प्रश्नांसाठी राज ठाकरे राज्यपालांना भेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान राज ठाकरे मायक्रोफायनान्स कंपन्यांचा मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लॉकडाऊन काळात अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकांनी कृष्णकुंज गाठलं होतं, यात मुंबईचे डबेवाले, त्र्यंबकेश्वरचे पुजारी, ज्येष्ठ नागरिक, कोळी महिला, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, महिला बचत गट अशा अनेक लोकांनी राज ठाकरेंकडे मदतीसाठी विनवणी केली होती. वेळोवेळी राज ठाकरेंनी या समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement