'पानिपत' सिनेमाचं राज ठाकरेंकडून कौतुक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पानिपत सिनेमाचं प्रदर्शनापूर्वीच कौतुक केलं आहे.

SHARE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पानिपत सिनेमाचं प्रदर्शनापूर्वीच कौतुक केलं आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'पानिपत' येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा कसा पाहावा यासंदर्भातील एक 'ट्विट' राज ठाकरे यांनी केली आहे. 'पानिपतच्या लढाईकडे कसं पाहायला हवं' याबाबतचं ट्विट त्यांनी केलं आहे.

इतिहास म्हणून पाहावं 

मऱ्हाठेशाहीच्या शौर्याचा इतिहास म्हणून या कडे पाहावं आणि त्यासाठी पानिपत सिनेमा पाहायला हवा, अशी पोस्ट ठाकरे यांनी केली आहे. 'पानिपतची लढाई ही मऱ्हाटेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपावणाऱ्या मरहट्ट्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकपार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली?

हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनीदेखील पहायला हवा’, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे. हे ट्विट राज ठाकरे यांनी आशुतोष गोवारीकर यांना टॅगही केलं आहे.


हेही वाचा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलं ट्विट, युजर्स म्हणाले 'युवराज का इंटरनेट स्लो है'

ठाकरे सरकारमध्ये बंगले वाटपावरून नाराजी?संबंधित विषय
ताज्या बातम्या