SHARE

सध्या मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ग्रानसम्राज्ञी लता मंगेशकर लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. या तमाम चाहत्यांसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील लतादीदी लवकरच ठणठणीत बऱ्या होतील, असं म्हणत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मनापासून प्रार्थना केली आहे. 

राज ठाकरे यांनी एक ट्विट करत त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय. असं राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.


श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे लतादीदींना रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या छातीत संसर्ग झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अनेक वर्षांच्या गायनामुळे तसंच वाढत्या वयोमानामुळे त्यांच्या फुफ्फुसाच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.

त्यांच्यावर डाॅ. पॅटीट समधानी उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती नाजूक असली, तरी त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याने प्रकृतीत हळुहळू सुधारणा होत असल्याची माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी दिली आहे.हेही वाचा-

लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

माझ्यासोबत कोणी चुकीचं वागून पळून जाऊ शकत नाही - लता मंगेशकर 

संबंधित विषय
ताज्या बातम्या