माझ्यासोबत कोणी चुकीचं वागून पळून जाऊ शकत नाही - लता मंगेशकर

मी जेव्हा तरुण होते तेव्हा मला खूप राग यायचा. मी रागीट होते. त्यामुळे माझ्यासोबत कोणी चुकीचं वागून पळून जाऊ शकत नव्हतं असं म्हणत दीदींनी आपल्या जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला.

SHARE

तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर #Mee Too या मोहिमेने संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. दररोज विविध क्षेत्रांमधील बड्या व्यक्तींवर यौन शोषणासोबतच इतरही आरोप होत असून, बाॅलीवूडमधील बरीच प्रकरणं चव्हाट्यावर येत आहेत. अशातच गानसम्राज्ञाी भारतरत्न लता मंगेशकर यांनीही #Mee Too बाबत आपलं मत व्यक्त करत माझ्यासोबत कोणी चुकीचं वागून पळून जाऊ शकत नाही, असं म्हटलं आहे.


धडा शिकवायला हवा

लतादीदी म्हणाल्या की, मी जेव्हा तरुण होते तेव्हा मला खूप राग यायचा. मी रागीट होते. त्यामुळे माझ्यासोबत कोणी चुकीचं वागून पळून जाऊ शकत नव्हतं असं म्हणत दीदींनी आपल्या जुन्या काळातील आठवणींना उजाळा दिला. वर्तमान काळातील परिस्थितीबाबत भाष्य करताना त्या म्हणाल्या की, नोकरदार स्त्रियांना त्यांचा मान-सन्मान आणि उचित स्थान मिळायला हवं असं मला वाटतं. या गोष्टी मिळवण्याचा त्यांना हक्क आहे. जर कोणी याला नकार देत असेल, तर त्याला योग्य धडा शिकवायला हवा असंही दीदी म्हणाल्या.


बॅालीवूडमधील वातावरण दूषीत

#Mee Too मुळे सध्या बॅालीवूडमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. नाना पाटेकर, साजीद खान, विकास बहल, आलोक नाथ, चेतन भगत, कैलाश खेर, सुभाष घई, लव रंजन, सौमिक सेन, पियूष मिश्रा, कुशन नंदी, गौरांग दोषी, रोहित राॅय यांसारख्या काही बड्या व्यक्तींवर यौन शोषणासोबतच हाणामारी आणि गैरवर्तनाचे आरोप करण्यात आल्याने बॅालीवूडमधील वातावरण दूषीत झालं आहे.हेही वाचा -

बॉलीवूडवर सलमान-दीपिकाचंच राज्य! 

‘गॅटमॅट होऊ देना…’ म्हणत अवधूतने छेडला तरुणाईचा सूर
संबंधित विषय
ताज्या बातम्या