Advertisement

मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही, राज ठाकरेंचं पवारांना प्रत्युत्तर

मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही, अशा शब्दांत राज यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही, राज ठाकरेंचं पवारांना प्रत्युत्तर
SHARES

जातीपातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादीवर टीका करण्याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यावर मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही, अशा शब्दांत राज यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या सल्ल्याविषयी प्रश्न विचारला असता, राज ठाकरे म्हणाले, मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावं. एका चॅनेलला मी मुलाखत दिली. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७५ वर्षांमध्ये आपण काय कमावलं आणि गमावलं या विषयावर ती मुलाखत होती. 

मी त्यांना हेच सांगितलं की आपण वैचारिकदृष्ट्या जोपर्यंत प्रगत होत नाही, तोपर्यंत आपल्याकडे कितीही चांगल्या गोष्टी आल्या, तरी आपली प्रगती होणार नाही, असं मी मत व्यक्त केलं. याच विषयाच्या अनुषंगाने आपल्याकडील जातीपातीचं राजकारण, निवडणुकांच्या काळात होणारी भाषणं ऐकली तर त्यात आम्ही तुम्हाला रस्ते, वीज, पाणी, शिक्षण देऊ असं सांगितलं जातं. तेव्हा या मागच्या ७४ वर्षांत आपण काय कमावलं आणि काय गमावलं हे आपण शोधलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- जगभरात कुठेही कोरोना लसीच्या बुस्टर डोसची गरज नाही : WHO

जात ही गोष्ट हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. एकट्या महाराष्ट्रातच नाही, तर देशभरातच ही परिस्थिती आहे. १९९९ साल जर आपण पाहिलं, तर त्याआधीपर्यंत राज्यात जातीपाती होत्याच. पण ९९ सालानंतर जातीपातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष वाढला. हे माझं वक्तव्य होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष जास्त वाढला. या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे पुन्हा वाचावेत, याचा अर्थच कळला नाही. माझ्या आजोबांचे अनेक संदर्भ त्या त्या काळातले होते. 

मला असं वाटतं आपल्याला पाहिजे तेवढंच प्रबोधनकार ठाकरेंचं घ्यायचं, बाकीचं घ्यायचं नाही असं करता येणार नाही. म्हणूनच मी म्हणालो मी जसे प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाण यांचे विचार कसे होते, ते कसं राजकारण करायचे हे देखील मी वाचलं आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा