Advertisement

हँडस अप....निकाल पैसा...!

जगात तेलाच्या किंमतींची घसरण झालेली असताना भारतात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमतीने आजपर्यंत उच्चांक गाठला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी व्यंगचित्र रेखाटलं आहे.

हँडस अप....निकाल पैसा...!
SHARES

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. 

जगात तेलाच्या किंमतींची घसरण झालेली असताना भारतात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमतीने आजपर्यंत उच्चांक गाठला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी हे व्यंगचित्र रेखाटलं आहे.


काय आहे या व्यंगचित्र?

'सर्वसामान्य माणूस गाडीत पेट्रोल भरण्यासाठी उभा आहे, यावेळीच नरेंद्र मोदी हे पेट्रोल भरताना हँडस अप! निकाल पैसा s s!' असं म्हणताना व्यंगचित्र रेखाटलं आहे. तर मोदींच्या शेजारी अमित शाह उभे आहेत. 'बाबांनो हेच का अच्छे दिन', अशी सर्वसामान्य नागरिक प्रतिक्रिया व्यक्त करत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. 'भाजपा सरकार सर्वसामान्य नागरिकांची अप्रत्यक्षपणे लुटमार करत आहे', अशी टीका राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून केेली आहे.

हेही वाचा - 

मोदी शाहांची निवडणुकांसाठी बॉल टँपरिंग यावेळी फसणार


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा