Advertisement

मुंबईत पेट्रोल, डिझेलचा भडका!

मुंबईत महिन्याभरात पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर २.२४ रुपयांची, तर डिझेलच्या दरांत प्रति लिटर ६६.४२ रुपये एवढी वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोल, डिझेलचा भडका!
SHARES

पेट्रोल, डिझेलच्या दरांचा देशात भडका उडाला असून सोमवारी या इंधन दराने मुंबईत उच्चांक गाठला. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८१.६९ रुपयांवर, तर डिझेल प्रति लिटर ६८.७९ रुपयांवर पोहोचले आहे.


दररोज आढावा

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर १५ जून २०१७ पासून नियंत्रणमुक्त केले आहेत. तेव्हापासून पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा आढावा घेतात. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनी घेतलेल्या आढाव्यानुसार मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा १० पैशांनी वाढ करण्यात आली आहे.


महिन्याभरात किती वाढ?

मुंबईत पेट्रोलचे दर १ मार्च रोजी प्रति लिटर ७९.४५ रुपये एवढे होते. त्यात महिन्याभरात २.२४ रुपयांची वाढ झाली आहे. तर १ मार्च रोजी डिझेलचे दर शहरात प्रति लिटर ६६.३० रुपये एवढे होते. महिन्याभरात त्यामध्ये २.४९ रुपयांची वाढ झाली आहे.



सीएनजीच्या दरांतही वाढ

रविवारपासून सीएनजीच्या दरांतही प्रति किलो १.२३ रुपयांची वाढ झाली आहे. सीएनजीचे दर प्रति किलो ४२.६३ रुपये इतके होते, ते आता ४४.२२ रुपये प्रति किलो होणार आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा