Advertisement

राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत, तरीही केलं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

राज ठाकरे यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलं. तरीही या दुखापतीची पर्वा न करता राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना निवडणुकांसाठी मोलाचे सल्ले दिले.

राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत, तरीही केलं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला पुन्हा एकदा दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे (raj thackeray) मंगळवारी वांद्रे येथील एमआयजी क्लब इथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आले असता, त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलं. तरीही या दुखापतीची पर्वा न करता राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना निवडणुकांसाठी मोलाचे सल्ले दिले.

येऊ घातलेल्या निवडणुका अत्यंत गांभीर्याने लढवण्याचं मनसेने ठरवलेलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पाठोपाठ अनेक ठिकाणच्या महापालिका निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी वांद्रे येथील एमआयजी क्लब इथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनिमित्ता एमआयजी क्लब इथं आले असता राज ठाकरे यांच्या डाव्या हाताला प्लास्टर दिसून आलं. 

गाडीतून खाली उतरताच त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी हाताला फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. शिवाजी पार्क इथं टेनिस खेळताना सोमवारी त्यांना ही दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. राज ठाकरे यांच्या हाताला हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हाताला सपोर्टर लावलं आहे.

हेही वाचा- राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसैनिकांचं नवं पथक?

काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्क जिमखान्यात चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासोबत टेनिस खेळतानाचे राज ठाकरेंचे फोटो व्हायरल झाले होते. याआधीही त्यांना अशीच दुखापत झाली होती. त्यांना टेनिस एल्बोचा त्रास झाला होता. त्यावेळीही त्यांनी हाताला सपोर्टर बांधलं होतं. 

त्यानंतर राज ठाकरे यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे (mns) पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत गंभीरपणे लढण्याचा सल्ला देतानाच मनसेच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी सर्वोपतरी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पाठोपाठ महापालिका निवडणुका येत असल्याने संघटनात्मक बांधणीकडे लक्ष द्यावं, घरोघरी मनसेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी चांगलं नेटवर्क तयार करा, जनतेच्या हिताच्या स्थानिक मुद्द्यांकडे लक्ष द्या, प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना देखील राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

(mns chief raj thackeray suffers hairline fracture at left hand)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा