Advertisement

राज ठाकरेंचा चौकीदारांवर निशाणा ...!


राज ठाकरेंचा चौकीदारांवर निशाणा ...!
SHARES

हिरे व्यापारी निरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातुन निशाणा साधला आहे.


काय आहे या व्यंगचित्रात?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून रेखाटलेलं व्यंगचित्र प्रसिद्ध केलं आहे. या व्यंगचित्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण देशाचे चौकीदार असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. त्या भाषणांचा धागा पकडत त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

नव्याने प्रसिद्ध केलेल्या या व्यंगचित्रात त्यांनी मद्यसम्राट विजय मल्ल्या, हिरे व्यापारी निरज मोदी यांच्यासारखे घोटाळेबाज बँका लुटून पळत असताना दिसत आहेत. स्वत:ला चौकीदार समजणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अरुण जेटली गाढ झोपलेले दिसत आहे. तर सर्वसामान्य ठेवीदार चिंतेत आहेत, असे या व्यंगचित्रात दर्शवलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा