नगरसेवकांकडून केलेल्या कामांची बॅनरबाजी

Prabhadevi
नगरसेवकांकडून केलेल्या कामांची बॅनरबाजी
नगरसेवकांकडून केलेल्या कामांची बॅनरबाजी
नगरसेवकांकडून केलेल्या कामांची बॅनरबाजी
See all
मुंबई  -  

आगार बाजार - महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रत्येक पक्ष आपण केलेल्या कामाची बॅनरबाजी करताना दिसू लागलाय.  पण, तुलनेनं मनसेनं केलेल्या कामाचा लेखा-जोखा बॅनरवर जास्त प्रमाणात पहायला मिळतो आहे. काही दिवसांपूर्वी वॉर्ड क्रमांक 187 चे नगरसेवक संतोष धुरी यांनी आपल्या विभागात नगरसेवक निधीतून केलेल्या कामांची बॅनरबाजी केलेली वरळीकरांनी पाहिली होती. आता मनसेचे नगरसेवक आणि गटनेते संदीप देशपांडे यांच्या कार्याचे बॅनर दादरकरांना पहायला मिळत आहेत. कार्यकाळात विभागात काय काय कामं केली, याचा सर्व लेखा-जोखा बॅनरच्या माध्यमातून आगार बाजार येथे संदीप देशपांडे यांनी मांडलाय. त्यामुळे देशपांडेंनी केलेली विकासकामं एकाच ठिकाणी दिसू शकतायत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नगरसेवकांचा ही बॅनरबाजी मतदारांच्या कशी आणि किती पचनी पडेल, हे पहाणं मात्र औत्सुक्याचं आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.